Breaking News

निरगुडी मध्ये महाराष्ट्रीयन बेंदूर उत्साहात साजरा

Maharashtrian Bendur celebrated with enthusiasm in Nirgudi

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)दि.१० जुलै २०२५ -  महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण अंतर्गत ग्रा.उ. का. का. 2025-26 आयोजित येथील उदयानकन्या  बुशरा तांबोळी , अनुराधा वाघ, शिवांजली कारंडे, संजना निकाळजे,  साक्षी शिंदे यांनी निरगुडीमध्ये महाराष्ट्रीयन बेंदूर  सोहळा आयोजित केला. या  कार्यक्रमांमध्ये  सरपंच , उपसरपंच , ग्रामसेवक , सहाय्यक कृषी अधिकारी , सर्व ग्रामस्थ आणि शेतकरी बांधव यांचा  उत्स्फूर्त  सहभाग होता . बैलांची सजावट आणि भव्य मिरवणूक हे या कार्यक्रमाचे  प्रमुख आकर्षण होते . 

    या सर्व उद्यानकन्यांना उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचे  प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. ए. डी. पाटील सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जे. व्ही. लेंभे सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ए. आर. पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments