आज १३१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ जुलै २०२५ - ग्राम विकास विभाग, अधिसुचना दि. १३ जून २०२५ चे अनुषंगाने, मा. जिल्हाधिकारी सो सातारा यांचेकडील आदेश क्रमांक साशा/ग्रापं-२/कावि-१८१/२०२५ दि.२०/०६/२०२५ अन्वये, सन २०२५-२०३० या कालावधीत होणाऱ्या फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वाटप करणेत आलेल्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करणेत आले आहे. तसेच, गाव निहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चितीसाठी तहसिलदार फलटण यांना प्राधिकृत केले आहे.
त्या अनुषंगाने सन २०२५-२०३० या कालावधीत होणाऱ्या फलटण तालुक्यातील १३१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गाव निहाय आरक्षण दिनांक ०४/०७/२०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता सजाई गार्डन मंगल कार्यालय, विमानतळाजवळ, फलटण जि. सातारा येथे निश्चित करणेत येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली.
No comments