Breaking News

सिस्टीन ॲग्रोकेमिकल कंपनीतुन कोणत्याही प्रकारचे सांडपाणी बाहेर पडत नाही

No wastewater of any kind is discharged from the Cysteine Agrochemical Company

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० जुलै २०२५ - ढवळेवाडी, निंभोरे ता. फलटण येथे एका रासायनिक खते उत्पादन करणाऱ्या कंपनीमुळे आसपासच्या विहिरींचे पाणी दूषित झाले असल्याचे वृत्त हे दिशाभूल करणारे असून, आमच्या भावकितीलच व्यक्तींनी वैयक्तिक स्वार्थ आणि इर्षेपोटी सदरची बातमी वृत्तपत्रांना दिली आहे, आमची कंपनी ही केंद्र सरकार पुरस्कृत योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रोजगार वृद्धीसाठी आणि सेंद्रिय शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादने बनवीत आहे.आम्ही कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत उत्पादन करीत नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे सांडपाणी आमच्या प्रक्रिया उद्योगातून बाहेर पडत नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन सिस्टीन ॲग्रो केमिकल कंपनीचे डायरेक्टर मनोज नरसिंगराव रणवरे यांनी दिला आहे.

    संजय संपतराव रणवरे  यांनी दिलेली  माहिती ही दिशाभूल करणारी आणि  वैयक्तिक स्वार्थ आणि ईर्षा या कारणाने दिलेली असून आमची कंपनी ही केंद्र सरकार पुरस्कृत योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रोजगार वृद्धीसाठी आणि सेंद्रिय शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादने बनवीत आहे.आम्ही कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत उत्पादन करीत नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे सांडपाणी आमच्या प्रक्रिया उद्योगातून बाहेर पडत नाही.

    संजय संपतराव रणवरे  यांनी  दूषित पाण्यासंदर्भात केलेले सर्व दावे हे

वैयक्तिक ईर्षेपोटी केल्याचे दिसून येत आहे.

    शासनाने दिलेले सर्व नियम काटेकोरपणे पाळत आम्ही प्रकल्प चालवीत असल्याचे सिस्टीन ॲग्रो केमिकल  प्रा. लि.निंभोरे ता. फलटणचे डायरेक्टर मनोज नरसिंगराव रणवरे यांनी सांगितले.

No comments