निरगुडी येथे पशु आरोग्य तपासणी संपन्न
फलटण (गंधवार्ता प्रतिनिधी) दि.३० जुलै २०२५ - फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील उद्यानकन्यांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत निरगुडी येथे गुरुवार दि. 24 जुलै 2025, रोजी पशु आरोग्य तपासणी आयोजित केली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर आडके, तसेच अध्यक्ष उपसरपंच सौ सारिका बनसोडे, व ग्रामस्थ आदि उपस्थित होते.
त्यानंतर डॉ. किशोर आडके यांनी लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव, त्याचा होणारा प्रसार, तसेच या रोगाचे लसीकरणाबद्दल आणि अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी गोठ्याचे निर्जंतुकीकरण कसे करावे त्याचे मार्गदर्शन करून गावातील जनावरांचे लसीकरण केले.
या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. ए. डी. पाटील सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जे. व्ही. लेंभे सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ए. आर. पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
उद्यानकन्या कारंडे शिवांजली, शिंदे साक्षी, निकाळजे संजना, वाघ अनुराधा , तांबोळी बुशरा यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
No comments