फलटण मध्ये मांजाने चिरला गळा ; १८ टाके
फलटण (गंधवार्ता प्रतिनिधी) दि.३० जुलै २०२५ - फलटण शहरातील आळंदी पंढरपूर मार्गावर नायारा पेट्रोल पंपाच्या समोर पांडुरंग कुंभार यांच्या गळ्याला नागपंचमीला चायनीज मांजाने कापले असून, त्यांना तब्बल 18 टाके पडल्याची माहिती डॉ. रवींद्र बीचुकले यांनी दिली.
फलटण शहर व उपनगरे येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात चायना मांजाची विक्री करण्यात आली असून, पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अगदी नाममात्र चायनीज माझ्या पकडण्यात आला, मात्र उंच इमारती वरून हजारो लोकांनी मोठ्या प्रमाणात चायना मांजा वापरत मानवी तसेच पशुपक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याने, हा चायनीज मांजा विक्री करणारे पोलिसांच्या रडारवर केव्हा येणार व त्यांच्या कधी कठोर कारवाई करणार असा जळजळीत प्रश्न फलटणकरांनी विचारला आहे.
फलटण शहर पोलीस ठाणे येथील अधिकारी व कर्मचारी यांनी गेले तीन ते चार दिवस चायनीज मांजा पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती, मात्र त्याला अल्प प्रतिसाद मिळत अनेकांनी पोलिसांना गुंगारा देत मोठ्या प्रमाणात चायना मांजाने पतंग उडवली. माझ्यामुळे पांडुरंग कुंभार यांच्या गळ्याला मोठ्या प्रमाणात इजा झाली असून त्यांचा जीव थोडक्यात वाचला आहे.
No comments