पतंग उडवत असताना विजेच्या तारांना चिकटल्याने युवकास शॉक
फलटण (गंधवार्ता प्रतिनिधी) दि.३० जुलै २०२५ - नागपंचमीच्या दिवशी शनिनगर, फलटण येथे एक युवक पतंग उडवत असताना दुर्दैवाने विजेच्या तारांना चिकटल्याने मोठ्या प्रमाणावर भाजला आहे. ही घटना दि. 29 जुलै रोजी दुपारी घडली.
सदर युवक पतंग उडवताना त्याचा दोरा शेजारील विद्युत वाहिन्यांशी संपर्कात आला. यामुळे जोरदार शॉक बसून युवकाचा मोठ्या प्रमाणावर हात-पाय व शरीराचा काही भाग भाजला. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने अधिक उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती, नागपंचमीसारख्या सणाच्या दिवशी अशा प्रकारे अपघात होणे ही चिंतेची बाब मानली जात आहे. पतंग उडवताना सुरक्षिततेचे भान ठेवणे व विद्युत तारांपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे, असा सल्ला नागरिकांनी दिला आहे.
No comments