निरा नदीत विसर्ग वाढला; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ जुलै २०२५ - वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे, वीर धरणातून निरा नदी पात्रात सुरू असलेला विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या ३३३८ क्युसेक्स विसर्ग सुरू असतानाच, दि. ७ जुलै रोजी सकाळी ८ वाजता त्यात आणखी ३۰۰० क्युसेक्सने वाढ करण्यात आली असून, एकूण विसर्ग ६३३८ क्युसेक्स इतका झाला आहे.
या वाढलेल्या विसर्गामुळे नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असून, नदीलगतच्या सर्व गावांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, निरा उजवा कालवा विभाग, फलटण यांनी केले आहे.
निरा नदीच्या दोन्ही तीरावरील गावांनी सतर्क रहावे, गरज नसताना नदीपात्रात जाऊ नये, जनावरे नदीकिनारी नेऊ नयेत तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून, नदीपात्रातील पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही तयार ठेवण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
No comments