Breaking News

पालखी सोहळ्यात आमदार सचिन पाटील व सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सहभाग

MLA Sachin Patil and Mrs. Jijamala Ranjitsinh Naik Nimbalkar participated in the palanquin ceremony

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ जून २०२५ - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळा फलटण शहरातून भक्तिपूर्ण वातावरणात बरडकडे प्रस्थान झाला. या दिव्य वैष्णव मेळ्यात लाखो वारकऱ्यांसह अनेक मान्यवरांनीही सहभागी होत श्रद्धेचा अनुभव घेतला.

    या पावन सोहळ्यात फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार सचिन पाटील सपत्नीक सहभागी झाले होते. तसेच जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पायी चालत वारी करत वारकऱ्यांमध्ये मिसळत आपला अध्यात्मिक सहभाग नोंदवला. 

    या दोन्ही मान्यवरांनी वारीच्या निमित्ताने साधू-संतांच्या सेवेत रुजलेली भक्तीभावना आणि वारकऱ्यांच्या सेवाभावी परंपरेचे कौतुक करत, वारीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांचे व वारकऱ्यांचे हे सहभागाचे दृश्य उपस्थित नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरले.

No comments