Breaking News

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केली पालखी सोहळ्यातील आरोग्य सेवेची पाहणी

 

Minister of State for Public Health Meghna Bordikar inspected the health services during the palanquin ceremony

    सातारा दि.२९ जून २०२५ -.: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेची सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पाहणी करून वारकऱ्यांची संवाद साधला.

    सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्रीमती साखरे बोर्डीकर यांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना देण्यात आलेल्या सुविधाची पाहणी केली. आरोग्य विभागाकडून पालखी सोहळ्यामध्ये ठीक ठिकाणी आरोग्य केंद्र उभारून वारकऱ्यांना औषध उपचारासह इतर सुविधा देण्यात येत आहेत याबद्दल सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्रीमती साकोरे बोर्डीकर यांनी समाधान व्यक्त केले.

    यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधून आरोग्यसेवा चांगल्या मिळत आहेत का याबाबत विचारणाही केली. यावर वारकऱ्यांनी आरोग्य, निवास सुविधा चांगल्या मिळत असल्याचे सांगितले.

No comments