श्रीमंत संजीवराजे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी ; नागरिकांना दिलासा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ मे २०२५ - मुसळधार पावसामुळे बाणगंगा नदीला महापूर आला होता, या महापुराचे पाणी नदी काठच्या घरांमध्ये घुसल्यामुळे, जनजीवन विस्कळीत झाले होते, पुरस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पूरग्रस्त भागात जाऊन धीर देण्याचे काम करत, नुकसानीची पाहणी करून, मदत पुरवली.
यावेळी माजी आमदार दिपक चव्हाण, जिल्हास्तरिय दिशा समितीचे सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका सौ. प्रगती भाऊसो कापसे, अभिजीत (भैय्या) जानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
No comments