Breaking News

सस्तेवाडीतील पूरग्रस्त वाबळे कुटुंबाला मदतीचा हात - प्रशासन व महायुतीच्या पुढाकाराने दिलासा

A helping hand to the flood-affected Wable family in Sastewadi - Relief provided by the administration and the Mahayuti initiative

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ मे २०२५ - सस्तेवाडी येथील माजी सरपंच सुनील वाबळे यांच्या घराला चारही बाजूंनी बाणगंगेच्या पुराचा वेढा पडल्याने मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. ही परिस्थिती पाहता महायुतीकडून तातडीने मदतीचा हात देण्यात आला.

    रात्रीच वाबळे कुटुंबाच्या मदतीसाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली आणि शक्य तेवढी मदत उपलब्ध करून दिली. आज दि.२६ मे २०२५ रोजी सकाळीच आमदार सचिन पाटील, प्रांत अधिकारी मॅडम प्रियंका आंबेकर, नायब तहसीलदार अभिजित सोनावणे व एनडीआरएफच्या पथकासह घटनास्थळी पोहोचून मदत कार्यात सहभागी झाले.

    वाबळे वस्ती परिसरात पूरपरिस्थितीची पाहणी करून प्रशासनाकडून आवश्यक ती मदत, बचावकार्य व उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गावकऱ्यांनी या तात्काळ मदतीसाठी प्रशासन व महायुतीचे आभार मानले आहेत.

No comments