Breaking News

आ.जयंत आसगावकर यांच्या निधीतून व महेंद्र सूर्यवंशी यांच्या प्रयत्नातून शाळांना प्रिंटर वाटप

Printers distributed to schools with funds from Jayant Asgaonkar and efforts of Mahendra Suryavanshi

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.10 -फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी(बेडके) यांच्या प्रयत्नातून, पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत दि. आसगावंकर यांच्या स्थानिक विकास निधीतून फलटण तालुक्यातील ३० माध्यमिक शाळांना दि.०८ मे २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण हायस्कूल, फलटण येथे संगणक प्रिंटरचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी(बेडके), सुरेश देसाई सर, प्रा. सुहास चौगुले, श्री. आर. जी. कांबळे व माध्यमिक शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments