बॉक्सर अभिराज मारुती तरडे यास राज्य सरकारची शिष्यवृत्ती जाहीर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ जून २०२५ - श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मधील पैलवान बॉक्सर अभिराज मारुती तरडे यास वुशू खेळातील राज्य सरकारची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील इयत्ता बारावी मधील बॉक्सर पैलवान अभिराज मारुती तरडे याने महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कुस्तीच्या वुशू प्रकाराच्या खेळात तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर सुवर्णपदक प्राप्त केले होते. तसेच राष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल महाराष्ट्र राज्य सरकारने त्यास शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यांनी नुकतीच शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली.
अभिराज तरडे यांने वुशू क्रीडा प्रकारात मिळवलेल्या दैदीप्यमान यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सचिव समशेरसिंह नाईक निंबाळकर, संचालक अजित गायकवाड, प्राचार्य रणदेव खराडे, प्राचार्य सुनील सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक अनुप शहा, नगरसेवक अजय माळवे, शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष फिरोज आतार, तानाजी कदम, निखिल उपाध्याय, दशरथ लोखंडे, प्रा. सतीश जंगम, प्रा. रवींद्र कोकरे, सचिन मोरे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.
No comments