संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २५ जून २०२५ - श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि.२६/०६/२०२५ ते दि.३०/०६/२०२५ अखेर सातारा जिल्हयातुन मार्गक्रमण करणार असून, पालखी सोहळा पुणे जिल्हयातुन सातारा जिल्हयात दि. २६/०६/२०२५ रोजी पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार असुन त्यानंतर लोणंद, तरडगांव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करुन दि.३०/०६/२०२५ रोजी सोलापूर जिल्हयात जाणार आहे. सदरचा पालखी सोहळा हा निरा लोणंद फलटण मार्गे पंढरपुर रस्त्याने जाणार असलेने तसेच पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होणार असल्याने पालखी जाणारे मार्गावर कोणताही अपघात घडू नये, वाहतुक समस्या निर्माण होवू नये, तसेच अनुचीत प्रकार घडू नये याकरीता पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३४ प्रमाणे प्राप्त अधिकारान्वये पालखी सोहळयातील वाहनाखेरीज व अत्यावश्यक सेवेतील (पोलीस, रूग्णवाहीका, अग्निशामक वाहने) खेरीज करून इतर सर्व वाहनांना निरा लोणंद पंढरपूर मार्गावर दि. २५/०६/२०२५ ते दि.३०/०६/२०२५ या कालावधीत खाली नमुद केल्याप्रमाणे प्रवेश करण्यास मनाई केली आहे.
१) दि.२५/०६/२०२५ रोजीचे ०६.०० ते दि.२९/०६/२०२५ रोजीचे २४.०० वा. पर्यंत फलटण येथून पुणे, निरा, लोणंद कडे जाणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पूणेकडे शिरगांव घाटातून वळविणेत येत आहे.
२) दि.२५/०६/२०२५ रोजीचे ०६.०० वा. पासून ते दि.२८/०६/२०२५ रोजी २४.०० वा. पर्यंत आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळयातील येणारे वाहनाखेरीज इतर वाहनांना बंद करणेत येत आहे.
३) दि.२५/०६/२०२१५ रोजीचे ०९.०० पासून ते दि.३०/०६/२०२५ रोजीचे १३.०० वा. पर्यंत लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदकी मार्ग फलटणकडे वळविण्यात येत आहे.
४) दिनांक २५/०६/२०२५ रोजीचे ००.०० वा. ते दिनांक २९/०६/२०२५ रोजीचे २४.०० वा. पर्यंत फलटण ते लोणंद या मार्गावरील वाहतुक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.
५) दि.२८/०६/२०२५ रोजीचे ००,०० पासून ते दि.३०/०६/२०२५ रोजीचे १६.०० वा. पर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.
६) दि.२८/०६/२०२५ रोजीचे ००.०० पासून ते दि. ३०/०६/२०२५ रोजीचे २४.०० वा. पर्यंत नातेपुते कडून पुणे बाजुकडे जाणारी वाहतुक माळशिरस, अकलुज येथुन बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.
७) दि.२८/०६/२०२५ रोजीचे ००,०० पासून ते दि.३०/०६/२०२५ रोजीचे १६.०० वा. नातेपुते कडून फलटण मार्ग साताराकडे जाणारी वाहतुक शिंगणापुर तिकाटणे मार्ग दहीवडी-सातारा अशी वळविण्यात येत आहे. नातेपुते कडून पुण्याकडे जाणारी वाहतुक नातेपुते-दहीगाव-जांब-बारामती मार्ग पुण्याकडे वळविण्यात येत आहे.
८) दि.२८/०६/२०२५ रोजीचे ००,०० पासून ते दि.३०/०६/२०२५ रोजीचे १४.०० वा. पर्यंत नातेपुते-वाई-वाठारकडे जाणारी वाहतुक शिंगणापुर तिकाटणे-शिंगणापुर-जावली-कोळकी-झिरपवाडी-विंचूर्णी-ढवळपाटी-वाठार फाटा मार्गे वळविण्यात येत आहे.
९) दिनांक २९/०६/२०२५ रोजी पालखी सोहळा हा फलटण येथुन पुढील बरड मुक्कामी सकाळी ०६.०० वा. मार्गस्थ होणार आहे. सदर वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणुन पालखीतील वाहने फलटण ते पंढरपुर रोडने बरडकडे जाण्याऐवजी फलटण दहीवडी चोक-कोळकी शिंगणापूर तिकाटणे-वडले-पिंप्रद-बरड अशी वळविण्यात येत आहे.
पालखी सोहळा दरम्यान पालखी मार्गावरील पालखी सोहळयातील वाहनाखेरीज इतर सर्व वाहने पर्यायी मार्गाने ये-जा करतील याची इतर वाहनधारकांनी नोंद घ्यावी.
No comments