Breaking News

जाधववाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून विमानतळ परिसर स्वच्छता ; वारकऱ्यांसाठी आंघोळीची सोय - दिपकराव सपकळ

Airport area cleaned through Jadhavwadi Gram Panchayat; Bathing facilities for Warkari - Deepakrao Sapkal

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ जून २०२५ - जाधववाडी (फ) हद्दीतील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल ते सजाई गार्डन या परिसरात गेले कित्येक दिवस वेडीबाभळी, काटेरी झुडपे वाढली होती, या झुडपांचा आडोसा मद्यप्रेमी अथवा इतर समाजकंटकांकडून गैरवापरासाठी सतत केला जात असतो, पालखीच्या पार्श्वभूमीवर सदर झुडपांचा आडोसा घेऊन शौचास बसणे व त्यामुळे या भागामध्ये दुर्गंधी पसरणे ह्या गोष्टी लक्षात घेता ग्रा.पं. जाधववाडीचे विद्यमान सदस्य दिपकराव सपकाळ यांनी ग्रामपंचायत जाधववाडी यांच्या माध्यमातून आज  वाढलेल्या झाडा झुडपांची सफाई केली,  यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी यांनी देखील जेसीबी उपलब्ध करून दिल्याबद्दल दिपकराव सपकळ व ग्रामस्थ यांनी मुख्याधिकारी निखिल मोरे  यांचे आभार व्यक्त केले.

    पालखी सोहळ्यातील महिला वारकऱ्यांची अंघोळीची गैरसोय होत असते, त्यामुळे वारकऱ्यांसाठी ग्रामपंचायत जाधववाडी यांच्या माध्यमातून सजाई गार्डन शेजारील काँक्रिट रोड वर व सेंट्रल अपार्टमेंट भिंतींच्या आतील बाजूस आंघोळीसाठी बंदिस्त व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांनी सदर सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिपकराव सपकळ यांनी केले.

    सदर परिसरामध्ये रात्रीचे अपप्रकार पहावयास भेटत असतात, आता संपूर्ण परिसर मोकळा झाल्यामुळे विमानतळामध्ये फिरायला येणारे नागरिक विशेषतः महिला वर्गाने विशेष आभार यावेळी व्यक्त केले.

No comments