Breaking News

फलटणच्या चैतन्य अजित शिंदे याने खेलो इंडिया बीच गेम्स मध्ये पटकावले ब्राँझ

Chaitanya Ajit Shinde of Phaltan wins bronze in Khelo India Beach Games

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २३ मे २०२५ - दिव,गुजरात येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया सागरी जलतरण स्पर्धेत फलटणचा सुपुत्र चैतन्य अजित  शिंदे याने महाराष्ट्राचा झेंडा फडकवलेला आहे, त्याने दिव समुद्रात दहा किलोमीटरचे अंतर 2 तास 13 मिनिटात पार करत तिसरा क्रमांक मिळवून महाराष्ट्रासाठी ब्राँझ मेडल पटकावले असून,  त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. फलटण येथील चैतन्य शिंदे सध्या क्रीडा प्रबोधिनी बालेवाडी पुणे येथे प्रशिक्षक बालाजी केंद्रे  व विशाल नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहे.

     चैतन्यने  राज्य  स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे, या कामगिरीच्या जोरावर त्याची खेलो इंडिया मध्ये सागरी जलतरण स्पर्धेत १० व ५ किलोमीटर स्पर्धेसाठी निवड झाली.  बुधवारी दि.२१ मे २०२५ रोजी गुजरात येथील घोगला बीच दिव समुद्रात झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत १० किलोमीटरचे अंतर २ तास १३ मिनिटात पार करत चैतन्य शिंदे याने तिसरा क्रमांक मिळवून ब्राँझ मेडल पटकावले आहे. या स्पर्धेसाठी राष्ट्रीय जलतरण संघटनेचे  सेक्रेटरी राजू पालकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

    चैतन्य शिंदेच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून, विधान परिषदेचे मा.सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,मा. जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राजे नाईक निंबाळकर, हॉकी प्रशिक्षक तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे  यांनी चैतन्यचे कौतुक करून  अभिनंदन केले आहे.

No comments