फलटण शहरातून चोरीस गेलेल्या मोटर सायकल सिकंदराबाद व लोणंद येथून जप्त
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३० एप्रिल - फलटण शहर पोलीस ठाणे गु. र.क्र.१३०/२०२४, कलम ३७९ भा.दं.सं. हा गुन्हा दि.०५/०३/२०२४ रोजी होंडा यूनिकॉर्न मोटर सायकल क्र. एमएच-५०-पी-६६०० ही एचडीएफसी बँकेची मागील बाजू, पृथ्वी चौक, फलटण येथुन चोरीस गेलेली होती. सदर मोटर सायकल ही गोपालपुरम वाहतुक पोलीस ठाणे, सिकंदराबाद येथे मिळून आल्याची माहिती मिळाल्याने, फलटण शहर पोलीस ठाण्याचे महिला पो.ह. पुनम वाघ यांनी सिकंदराबाद येथे जाऊन, दि.२५/०४/२०२५ रोजी सदर मोटर सायकल आणली आहे. सिकंदराबाद येथे सदर मोटर सायकलचा नंबर संबंधीत चोरट्याने बदललेला होता. यातील चोरटा अज्ञात असुन, त्याचा शोध लागलेला नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पो.ह. पुनम वाघ या करीत आहेत.
फलटण शहर पोलीस ठाणे गु. र.क्र.४०७/२०२१, कलम ३७९ भा.दं.सं. या गुन्ह्यातील हिरो कंपनीची स्प्लेंडर आय स्मार्ट मोटर सायकल क्र. एमएच-११-बीएस-२६९० ही तेजोमय अपार्टमेंट, विवेकानंदनगर, फलटण येथुन येथुन दि.०५/०९/२०२१ रोजी चोरीस गेलेली होती. सदर मोटर लोणंद पोलीस ठाणे गु.नॉ.क्र.८०/२०२५, कलम १३७(२), ८७, ६२(२) (एन) भारतीय न्याय संहिता, २०२३ सह कलम ४,६,८,१२ पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात जप्त करण्यात आली होती. सदर मोटर सायकल पो.शि. निखील गायकवाड यांनी सायकल ही लोणंद पोलीस ठाणे येथुन फलटण शहर पोलीस ठाणे आणली आहे. सदर गुन्ह्याचा तपास म.पोह. राणी फाळके या करीत आहेत.
सन २०२४ मध्ये फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीतुन एकुण २३ मोटर सायकल चोरीस गेल्या होत्या. त्या पैकी आज पर्यंत ९ मोटर सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. सन २०२५ मध्ये १२ मोटर सायकल चोरीस गेलेल्या आहेत. त्या पैकी ३ मोटर सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत.
त्या व्यतिरिक्त सन २०२२ मधील चोरीस गेलेल्या मोटर सायकल पैकी २ मोटर सायकल आणि सन २०२३ मध्ये चोरीस गेलेल्या मोटर सायकल पैकी १ मोटर सायकल अशा ३ मोटर सायकल सन २०२४ मध्ये जप्त करण्यात आल्या होत्या. सन २०२५ मध्ये वर नमुद प्रमाणे सन २०२१ मध्ये चोरीस गेलेली १ मोटर सायकल जप्त करण्यात आलेली आहे.
No comments