आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपाकडून अभिवादन
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३ - आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भाजपाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
फलटण शहर व तालुका भाजपाच्या वतीने आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, डॉ. सुभाषराव गुळवे, अमीरभाई शेख, विकी जाधव, नितीन जगताप आदी उपस्थित होते.
No comments