भाजी खरेदी करताना 66 हजार रुपयांचा मोबाईल चोरीला
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२४ - शहरातील माळजाई मंदिर परिसरात भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकाचा सॅमसंग कंपनीचा एस ट्वेंटी फोर हा 66 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आज्ञात चोरट्याने चोरून नेला.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 23/02/2025 रोजी सायंकाळी 06.00 ते 6.30 वाजण्याच्या दरम्यान, चंद्रकांत बळीराम गायकवाड वय 55 वर्षे, रा.गोळीबार मैदान फलटण, ता.फलटण माळजाई मंदिर परिसर,भुमी अभिलेख कार्यालय, फलटणचे पाठीमागे असलेल्या रोडवर, भाजी खरेदी करीत असताना सॅमसंग कंपनीचा एस 24 हा 66 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आज्ञात चोरट्याने चोरून नेला. अधिक तपास स.पो.फौ. एस.व्ही.कदम हे करीत आहेत.
No comments