फलटण व कोरेगाव तालुक्यातील गावांसाठी राज्य आपत्ती सौम्यीकरण निधी अंतर्गत ४ कोटी रुपयांचा निधी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १ - फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघाच्या ग्रामीण भागातील विविध गावात पुराचे पाणी येऊ नये, याकरिता ओढ्यालगत संरक्षक भिंत बांधण्यासाठी, राज्य आपत्ती सौम्यीकरण निधी अंतर्गत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपकराव चव्हाण यांनी सुचवलेल्या कामांसाठी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार ४ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
या कामांमध्ये १) मौजे दहिगाव बेघरवस्ती ओढ्यालगत संरक्षक भिंत बांधणे ता. कोरेगाव २२ लाख रुपये २) मौजे आसनगाव गावाजवळ ओढ्यालगत संरक्षक भिंत बांधणे, ता. कोरेगाव. २४ लाख रुपये ३) मौजे घिघेवाडी गावाजवळ ओढ्यालगत संरक्षक भिंत बांधणे. ता. कोरेगाव. २० लाख रुपये ४) मौजे वाघोली बौध्दवस्ती जवळ संरक्षक भिंत बांधणे.ता. कोरेगाव. २५ लाख रुपये ५) मौजे तळीये स्मशानभुमी जवळ ओढ्यालगत संरक्षक भिंत बांधणे, ता. कोरेगाव.२५ लाख रुपये ६) मौजे सोळशी स्मशानभुमी जवळ ओढ्यालगत संरक्षक भिंत बांधणे. ता. कोरेगाव. १५ लाख रुपये ७) मौजे आळजापुर ता. फलटण जि. सातारा येथील ओढयाकाठी संरक्षक भिंत बांधणे ३५ लाख रुपये ८) मौजे जावली सिध्दनाथ मंदिराजवळ ओढयालगत संरक्षक भिंत बांधणे ता. फलटण. ५० लाख रुपये ९) मौजे गोखळी स्मशानभूमीजवळ ओढ्यालगत संरक्षक भिंत बांधणे, ता. फलटण. ३५ लाख रुपये १०) मौजे मठाचीवाडी जि. प. शाळेमागे ओढ्यालगत संरक्षक भिंत बांधणे, ता. फलटण. २० लाख रुपये ११) मौजे निरगुडी गावाजवळ ओढ्यालगत संरक्षक भिंत बांधणे, ता. फलटण. ३४ लाख रुपये १२) मौजे तरडगाव स्मशानभूमी जवळ ओढ्यालगत संरक्षक भिंत बांधणे, ता. फलटण. १५ लाख रुपये १३) मौजे हणमंतवाडी झोपडपट्टी येथे ओढ्यालगत संरक्षक भिंत बांधणे, ता. फलटण. २० लाख रुपये १४) मौजे आदर्की बु स्मशानभूमी जवळ ओढ्यालगत संरक्षक भिंत बांधणे, ता. फलटण.२० लाख रुपये १५) मौजे आदर्की बु माळवाडी सदन आकोबा निंबाळकर यांचे शेताजवळ ओढ्यालगत संरक्षक भिंत बांधणे, ता. फलटण.२२ लाख रुपये १६) मौजे हिंगणगाव स्मशानभूमी जवळ ओढ्यालगत संरक्षक भिंत बांधणे, ता. फलटण.१८ लाख रुपये.
No comments