श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय जलदगती एकदिवसीय बुद्धीबळ स्पर्धांचे आयोजन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त मुधोजी क्लब फलटण, क्लासिकल चेस अकॅडमी फलटण, कोहिनूर चेस क्लब अँड स्पोर्ट्स क्लब फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी, अनंत मंगल कार्यालय कोळकी तालुका फलटण येथे भव्य राज्यस्तरीय जलदगती एकदिवसीय बुद्धीबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ६ ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते बुद्धिबळ स्पर्धांचे उद्घाटन होईल आणि त्वरित प्रथम फेरी सुरू करण्यात येईल. स्पर्धेसाठी चीफ ऑर्बिटर म्हणून शार्दुल तपासे, डेप्युटी चीफ ऑर्बिटर म्हणून प्रणव टंगसाळे तर ऑर्बिटर म्हणून सारिका साबळे, दिपंकर कांबळे, श्रेयस कांबळे, रोहिणी तुम्मा, रुपेश हागीर, उद्धव पाटील हे काम पाहणार आहेत.
राज्यस्तरीय जलदगती एकदिवसीय बुद्धीबळ स्पर्धा आठ वर्षाखालील गट, ११ वर्षाखालील गट,१४ वर्षाखालील गट, व खुला गट या गटांमध्ये खेळवल्या जातील. प्रत्येक वयोगटात एकूण १५ विजयी क्रमांक काढले जातील. त्यांना रोख बक्षीस व पदक असे पारितोषिक देण्यात येईल. त्याचबरोबर खास बक्षीसेही देण्यात येणार आहेत. या स्पर्धा आंतरराष्ट्रीय फिडे नियमानुसार स्विस लीग पद्धतीने होतील. एकूण फेऱ्या स्पर्धकांच्या संख्येवर अवलंबून राहतील (स्विस लीग पद्धत). वेळ मर्यादा - १५ मिनिटे आणि ५ सेकंद अतिरिक्त वेळ प्रत्येक चालीला. स्पर्धेत खुल्या गटासाठी ४०० रुपये व वयोगटासाठी ३०० रुपये प्रवेश फी आहे. प्रत्येक वयोगटातील विजेत्या खेळाडूंनी आधार कार्ड घेऊन येणे बंधनकारक असल्याची माहिती स्पर्धेची आयोजक समिती नझीर काझी (९८५०८६७५८७), सुरज फडतरे (७३८७३२२७१४), अक्षय पिसाळ (७०३८१४२१३५), संध्याराणी सस्ते (७४९९४२७७०२), अक्षय कांबळे (८६६८८०४२०८), सुजित जाधव (७४४८०५०८२१), तेजस गोरे (८८५५००५२२३५) यांनी दिली आहे.
No comments