फलटण येथे भाजपाकडून मोफत नेत्रचिकित्सा - चस्मा वाटप व शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद
फलटण दिनांक २७ ( प्रतिनिधी ) फलटण शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप आणि मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असल्याची माहीती युवा नेते अभिजीतभैय्या नाईक निंबाळकर यांनी दिली.
वाढत्या डोळ्यांच्या आजाराबाबत सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळावा, आवश्यक नेत्र तपासणी व्हावी , या उदात्त उद्देशातून फलटण शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने फलटण शहरातील १२ प्रभागात मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नेत्र तपासणीनंतर आवश्यक असणाऱ्या रुग्णांना मोफत औषधोपचार, मोफत चष्मा वाटप, शस्त्रक्रि या आवश्यक असल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ फलटण शहरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन भाजप शहर अध्यक्ष अनुप शहा यांनी केले आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येते.
व्यसनमुक्ती, स्वछता अभियान, महिला सक्षमीकरण, रोजगार मेळावे आदी उपक्रमांसह आता भव्य अशा मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
No comments