दुधेबावी प्रतिष्ठानची सातत्यपूर्ण चालणारी व्याख्यानमाला निश्चित प्रेरणादायी - डॉ. अभिजीत जाधव
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.९ - दुधेबावी प्रतिष्ठानची २४ वर्ष सातत्यपूर्ण चालणारी व्याख्यानमाला सातारा जिल्ह्यात निश्चित प्रेरणादायी असून दुधेबावी प्रतिष्ठानला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी सांगितले.
दुधेबावी ता. फलटण येथील दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित संत गाडगेबाबा व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता होते.
एखादी चळवळ सुरू करणे खूप सोपं असत तथापी त्यामध्ये सातत्य ठेवणं हीच बाब कौशल्याची असते. प्रबोधन चळवळ ही काळाची गरज असून, सकारात्मक परिवर्तन अशा व्याख्यानमाल्यांच्या माध्यमातून निश्चितपणे होत असते. स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा देण्याचा प्रतिष्ठानचा उपक्रमही निश्चित कौतुकास्पद आहे.
जेष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता म्हणाले, बऱ्याच गावांमध्ये व्याख्यानमाला सुरू झाल्या परंतु त्यामध्ये सातत्य टिकले नाही, दुधेबावी प्रतिष्ठानचे सामाजिक उपक्रम निश्चितच सातारा जिल्ह्यात अग्रेसर असून प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची त्यामध्ये झोकून देण्याची वृत्ती गौरवास्पद असल्याचे अरविंद मेहता यांनी निदर्शनास आणून दिले.
पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर म्हणाले दुधेबावी प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेमुळे दुधेबावी गावांमध्ये स्पर्धा परीक्षांच्या यशात निश्चितपणे भर पडला असून, युवकांना प्रेरणादायी दिशा देण्याचे काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे.
सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव म्हणाले, सामाजिक उपक्रम राबवणारी दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था निश्चितपणे सातारा जिल्यात अग्रेसर असून सामाजिक भावनेतून दिलेले योगदान निश्चित जीवनात आनंद देत असते. झाडाचे रोप देऊन केला जाणारा सत्कार पर्यावरणाचा संदेश देणारा असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.
यावेळी कै. विठ्ठल बापूजी ठोंबरे राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार साहित्यिक मारुतराव बापूराव वाघमोडे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रा. रवींद्र कोलवडकर, साहित्यिक मारुतराव वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी केले, व्याख्यानमाला कमिटीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे यांनी केले.सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संतोष भांड व सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रा.नवनाथ लोखंडे, तानाजी वाघमोडे, देवराम जाधव, वीरकर सर, तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाषराव सोनवलकर, दत्तात्रय काळे,अंकुश शिंदे, प्रतिष्ठानचे सचिव विठ्ठल सोनवलकर , खजिनदार डॉ. युवराज एकळ, अण्णा भुंजे पोपटराव सोनवलकर वृक्षमित्र सचिन सोनवलकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments