Breaking News

कोण होणार माढ्याचा खासदार? या पैजेची फलटणमध्येही जोरात चर्चा

Who will be MP of Madha? This bet is also discussed loudly in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० - माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत  कोण होणार माढ्याचा खासदार? यावर पैज लावून, तो संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे, यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व धैर्यशील मोहिते पाटील यापैकी कोण विजयी होईल? यावर महिंद्रा थार या चारचाकी वाहनाची पैज लावण्यात आली असून, तो संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

    सध्या या पैजेची फलटणमध्ये जोरात चर्चा सुरु आहे. ही पैज व्हायरल होताच, या पैजेची शहानिशा करण्यासाठी फलटण तालुक्यातील काही  व्यक्तींनी मोबाईल द्वारे पैजेची खात्री करून घेतली. मात्र अशाप्रकारे पैज लावणे, हे बेकायदेशीर असल्याचे व पैज लावल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो ही वस्तुस्थिती समोर येताच, सर्वजण वेळीच सावध होऊन पैज लावण्यापासून परावृत्त झाले.

No comments