Breaking News

कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांची महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या प्रसिद्धी समितीच्या सदस्यपदी निवड

Selection of Dadasaheb Chormale as Member of Publicity Committee of Maharashtra Kho-Kho Association

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० - पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या बैठकीत विविध समित्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने प्रसिद्धी समितीच्या सदस्य पदी आस्था टाईम्सचे  कार्यकारी संपादक तथा राष्ट्रीय खो - खो खेळाडू कृष्णात उर्फ दादासाहेब चोरले यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    पुणे येथे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यामध्ये विविध समित्या समित्या व त्यांचे अध्यक्ष, सचिव व सदस्य यांच्या निवडी महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी जाहीर केल्या आहेत. 

    यामध्ये प्रसिद्ध समितीच्या अध्यक्षपदी अजित संगवे तर सचिवपदी राजेश कळंबटे यांची निवड करण्यात आली असून सदस्य पदी दादासाहेब चोरमले, भूषण कदम, महेश विचारे, संदीप बल्लाळ, प्रेमचंद चौधरी व गणेश माळवे यांची  निवड करण्यात आली आहे.

    निवडी बद्दल महाराष्ट्र विधान राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपक चव्हाण, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा.डॉ. चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार  ॲड. गोविंद शर्मा इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

No comments