Breaking News

कोण होणार खासदार? यावर पैज लावलेल्या दोघांवर गुन्हा दाखल ; २ दुचाक्या जप्त

Who will be MP? A case has been registered against the two who bet on this

    सांगली (गंधवार्ता वृतसेवा) दि.२० - सांगली लोकसभा निवडणुकीत कोण होणार सांगलीचा खासदार ? यावर पैज लावलेल्या दोघांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश संभाजी जाधव (वय 29, रा. बोरगाव) आणि गौस मुबारक मुलाणी (वय 38, रा.शिरढोण) या दोघावर हा गुन्हा दाखल झाला आहे. दोघेजण हे कवठेमहांकाळ तालुक्यातील असून, याप्रकरणी पोलिसांनी दोन दुचाकी वाहने जप्त केली आहेत.

    दिनांक १७ मे २०२४ रोजी ५.३० वाजण्याच्या सुमारास शिरढोण गावचे ह‌द्दीत बस स्टॉपच्या पुढे विठ्ठल मंदीरजवळ असले सेतु केंद्र मध्ये १. रमेश संभाजी जाधव वय २९ वर्षे, रा. बोरगांव, ता. कवठेमहांकाळ १. गौस मुबारक मुलानी वय ३८ वर्षे, रा. शिरढोण, ता. कवठेमहांकाळ यांनी सांगली लोकसभा निवडणुक २०२४ चा निकाल भाजप पक्षाचा उमेदवार निवडुन येईल की अपक्ष उमेदवार निवडणुन येईल यासाठी स्वतःच्या फाय‌द्याकरीता स्वतःच्या नावावरती नोंद असलेल्या बुलेट गाडी क्र. एमएच १० डीएफ ११२६ व हॉन्डा कंपनीची युनिकॉर्न गाडी क्रमांक एमएच १० डीएच ८८०० यांची पैज लावुन सदरबाबतचा संदेस वॉट्सअप मिडीया, फेसबुक माध्यम द्वारे प्रसारित करुन मिळुन आले आहेत म्हणुन माझी त्यांचे विरुध्द महाराष्ट्र जुगार अधिनियम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयावरुन पैजा लागल्या आहेत. अपक्ष उमेदवार विशाल पाटील निवडून आले तर रमेश संभाजी जाधव यांच्याकडून यूनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलाणी यांना देण्यात येईल. तसेच भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील निवडून आले तर गौस मुबारक मुलाणी यांचेकडून बुलेट गाडी रमेश संभाजी जाधव यांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे.

No comments