Breaking News

महायुतीच्या विरोधात प्रचार करणाऱ्या राजे गटाची राष्ट्रवादीतून हाकालपट्टी करावी - अशोकराव जाधव

The Raje group campaigning against the Grand Alliance should be expelled from the NCP - Ashokarav Jadhav

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२७ - माढा लोकसभा मतदार संघाचे निवडणुकीत महायुतीने दिलेल्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार न करता, फलटण मधील राजे गटाने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार केला, मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेळाव्यात, या विषयावर अजितदादांनी शिस्त भंगाची कारवाई करण्या बाबत विचार होणार का? वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाअध्यक्ष पद श्रीमंत संजिवराजे यांचे कडे असताना व संक्रातीच्या मेळाव्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विकासाभिमुख नेतृतवास साथ देत, सत्तेत सहभागी होऊन, फायदा घ्यायचा व युती धर्माचे पालन करायचे नाही, हा मिठाचा खडा राजे गटाने महायुतीत टाकलेला आहे.

    श्रीमंत रामराजे व त्यांचे गटाने विरोधात केलेल्या कामाची पक्ष पातळीवर चौकशी करून, त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करणेत यावी अन्यथा महाराष्ट्रात पुढील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीवर कोणीही विश्र्वास ठेवणार नाही, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी याची दखल घेऊन,    योग्य ती कारवाई करावी व विकास कामांना देणाऱ्या निधी बाबत विचार करावा अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू व फलटण नगर परिषदेचे गट नेते अशोकराव जाधव यांनी केली आहे.

No comments