Breaking News

विकास आणि जनतेच्या विरोधात निर्णय घेणार्‍यांना जनता माफ करणार नाही, आता जनता तुतारीची पिपाणी करेल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

People will not forgive those who take decisions against development and people - Deputy Chief Minister Devendra Fadnavis

बाणगंगा नदी वाहती करायची आहे - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर 

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.५ - विकासकामांमुळे विरोधकांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु 'देव तारी त्याला कोण मारी..' आणि येथे 'जनता म्हणजेच देव' आहे. याच जनतेने आता ही निवडणूक हातात घेतली आहे. अस्मिता, विकास आणि जनतेच्या विरोधात निर्णय घेणार्‍यांना जनता कधीच माफ करत नाही. आता जनता तुतारीची पिपाणी करणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

    भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर  यांच्या प्रचारार्थ आज फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित विजयी संकल्प सभेत उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, माढा लोकसभेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार प्रसाद लाड, माजी जिल्हा परिषद सभापती मंगेश धुमाळ, डॉ. दिलीप येळगावकर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील, उद्योजक राम निंबाळकर, दौलतनाना शितोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

    पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणकरांचे चोरीला गेलेले पाणी परत आणले, या भागात फलटण-बारामती रेल्वे आणली आणि 23 वर्ष बंद असलेल्या फलटण-पंढरपूर रेल्वेच्या कामासाठी ₹921 कोटीची मंजूरी मिळवली. यासोबतच पुणे-बंगळुरू ग्रीन कॉरिडॉर हा सुमारे ₹50,000 कोटींचा प्रकल्प त्यांच्याच पाठपुराव्यामुळे सुरू होतो आहे. या कॉरिडॉरभोवती सुरू होणार्‍या एमआयडीसी मुळे तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी फलटण हिमालयासारखा उभा असल्याचीच ग्वाही या सभेला उपस्थित जनसागरानेच दिली.

    पाच वर्षांपूर्वी सर्व सत्ता स्थाने एका बाजूला असताना देखील तालुक्याने व माढा लोकसभा मतदारसंघाने मला स्वीकारून मला खासदार केलं, निवडणुकीत जनतेला दिलेल्या शब्द मी पूर्ण  केले आहेत आणि आज पुन्हा एकदा निवडणुकीसाठी आशीर्वाद मागण्यासाठी आज उभा आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बारामतीला गेलेले पाणी मतदारसंघात पुन्हा आणले, तसेच प्रलंबित रेल्वे प्रश्न मार्गी लावला, पालखी महामार्ग तसेच शहरातील सुशोभीकरण व रस्ते, आदर्की सातारा रस्ता, वारुगड रस्ता, ग्रीन कॉरिडोर महामार्ग, नवीन एमआयडीसी, सेशन कोर्ट, आरटीओ ऑफिस अशी विविध विकास कामे मार्गी लावली आहेत. तसेच फलटण शहरात  तारांगण, मत्स्यालय, महिलांसाठी जिम अशी विविध विकास कामे आपण केलेली आहेत. आज इथे मी कुणाला हरवण्यासाठी किंवा कोणाची जिरवण्यासाठी उभा राहिलेला नाही, माझ्यावर जो जनतेने विश्वास टाकला आहे, तो मी पूर्णत्वास नेला आहे आणि आज मला शेजारील बारामती शहरासारखे फलटण शहर करायचे आहे.  फलटण मधून जाणारी बानगंगा नदीमध्ये सर्वत्र गटारे सोडण्यात आली आहेत, तर माझं व्हिजन आहे की, ही गटारी बंद करून, या नदीला स्वच्छ करून, निरा देवघर योजनेतून जास्तीचे पाणी या नदीमध्ये सोडून ही बाणगंगा नदी वाहती करायची असल्याचे प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

    फलटणचे आमचे तिने भाऊ माझ्या विरोधात काम करत आहेत, त्यांनी काम न केल्याने  मला दुःख नाही, मात्र मला आनंद आहे की, मी  फलटण शहरात विकास कामे करत आहे आणि पुढील शंभर वर्षात फलटण कसे असावे  याचे व्हिजन मी बांधले आहे, काही लोक माझे अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न करत आहेत, माझे अस्तित्व पुसल्याने शहराचा विकास थांबणार आहे. शेतकऱ्यांना अडचणी येणाऱ्या आहेत. बानगंगा वाहती करण्याचे स्वप्न जे पाहिले आहे ते स्वप्न थांबणार आहे. कित्येक संस्था उद्योग इथे आणण्याचे स्वप्न थांबणार आहे. फलटण मध्ये चांगली स्मशानभूमी असावी असे पाहिलेले स्वप्न थांबणार आहे,  ही माझी जन्मभूमी कर्मभूमीचे दायित्व फेडण्याची संधी या फलटण शहराने मला द्यावी. कोण कुठल्या पक्षाचा आहे हे न पाहता फलटणच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे, फलटणमध्ये कोणावर अन्याय होण्याची भूमिका माझ्याकडून होणार नाही, अनेक जणांनी प्रवेश केलेला आहे, मी जर चुकीच्या पद्धतीने लोकांना वागणूक दिली असती तर हे लोक माझ्याकडे आले नसते. त्यामुळे गोरगरीब जनतेच्या मुलांसाठी, नाईकबामवाडी येथील एमआयडीसी उभारण्यासाठी, फलटण शहरात औद्योगिक जाळे तयार करण्यासाठी, फलटण तालुका टॉप लिस्ट मध्ये आणण्यासाठी मला तुम्ही साथ देणार आहे का नाही असा सवाल जनतेला करून, या निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन  खासदार रणजीतसिंह नाईक  निंबाळकर यांनी केले

    यावेळी बोलताना महादेव जानकर म्हणाले की, फलटणच्या विमानतळामध्ये प्लॉटिंगचे काम सुरु आहे, ते थांबवून तेथे विमानतळ सुरू झाले पाहिजे. स्टार एमआयडीसी झाली पाहिजे. तसेच रेल्वे वॅगन तयार करण्याचा कारखाना सातारा जिल्ह्यात आणावा तसेच डिफेन्स साहित्याचा कारखाना देखील सातारा जिल्ह्यात आणावा असे अशी मागणी महादेव जानकर यांनी करून माझं किंवा रणजितदादांच यांचे काही चुकले असेल तर आम्हाला मोठ्या मानाने माफ करा. ही निवडणूक हि नागपरिषद, जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत नाही आहे. देशाचे भलं जो करणार आहे त्याच्या सोबत राहणे गरजेचे आहे असल्याचे  सांगून यांना विजयी करण्याचे आवाहन माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले.

No comments