Breaking News

धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्यासाठी राजे गट व महाविकास आघाडीच्या युवा नेतृत्वांची प्रचारात आघाडी

 फलटण शहरात पदयात्री प्रसंगी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, विश्वतेज मोहिते पाटील, महेंद्र सूर्यवंशी (बेडके) व इतर
Youth leaders of Raje group and Mahavikas Aghadi are leading the campaign to win the courageous Mohite Patil

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.५ – माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराची फलटण तालुक्याची धुरा, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजे गटाच्या युवा नेत्यांनी सांभाळली असून, श्रीमंत अनिकेत राजे, श्रीमंत सत्यजितराजे, श्रीमंत विश्वजितराजे यांनी फलटण शहर तसेच तालुक्यात होम तू होम प्रचार करून प्रचारात आघाडी घेतली आहे. तसेच महाविकास आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेसचे फलटण तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, कै. सुभाषराव शिंदे यांचे सुपुत्र चेतन शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र विश्वतेज मोहिते पाटील या युवा नेते मंडळींनीही घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

पदयात्रे दरम्यान जनतेच्या जनतेशी संवाद साधताना  श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर
 फलटण ग्रामीण भागात युवा वर्गासह प्रचार करताना श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर

    फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी उघडपणे धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार सुरू केला होता. सध्या घरोघरी महाविकास आघाडीच्या युवा नेते मंडळीनी प्रचार यंत्रणा राबवली असून त्यामध्ये श्रीमंत रघुनाथराजे यांचे पुत्र माजी पंचायत समिती सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर , आमदार श्रीमंत रामराजे यांचे पुत्र श्रीमंत अनिकेतराजे ,श्रीमंत संजीवराजे यांचे पुत्र श्रीमंत सत्यजितराजे हे उघडपणे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचारात सहभागी झालेले आहेत.  युवा नेत्यांची या निमित्ताने प्रत्येक घरोघरी ओळख निर्माण होत आहे.तसेच छोट्या छोट्या बैठकीद्वारे सुद्धा ते मतदारांची संपर्क साधत आहे. एकंदरीत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात  युवा नेत्यांनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.

नागरिकांशी संवाद साधताना श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर

No comments