Breaking News

शरद पवारांनी फलटण तालुक्यातील जनतेला फसवलं ; ज्या माणसांनी तुम्हाला मतदान ठोकलं, त्या माणसांना तुम्ही बरणीत घालुन ठोकलं - खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

Sharad Pawar deceived the people of Phaltan taluka - MP Ranjitsinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१९ - फलटण तालुक्यातील जनतेला शरद पवारांनी फसवले आहे, नीरा देवघरचे पाणी घेऊन गेले, धोम बलकवडीचे पाणी दिले नाही, रेल्वेचे प्रकल्प पूर्ण होऊ दिले नाहीत, रस्ते केले नाहीत, गोरगरिबांचे कल्याण केले नाही, जे प्रकल्प येतील ते सर्व बारामतीला नेले, मेडिकल कॉलेज बारामतीला, आयटी पार्क बारामतीला, विमानतळ बारामतीला, इथून माणसे देखील नोकरी करण्यासाठी बारामतीला नेली, आम्ही काय गुलाम आहे का? असा सवाल करून, तुम्हाला ज्या माणसाने मतदान ठोकलं, त्या माणसांना तुम्ही बरणीत घेऊन ठोकले, महाराष्ट्राच्या जाणत्या राजाने , आमचा गेम केला असून,  त्या गेम मध्ये बरेचजण सामील होते अशी  घनाघाती टीका खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.

    भाजपा व महायुतीचे माढा लोकसभेचे अधिकृत उमेदवार खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचा फलटण तालुका प्रचार दौरा सुरू असून, खासदार रणजितसिंह यांनी  आज पाडेगाव, तरडगाव, हिंगणगाव, सुरवडी, वाठार निंबाळकर, सस्तेवाडी, साखरवाडी या पंचायत समिती गणातील समाविष्ट गावातील लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. हिंगणगाव येथे बैठकीचे आयोजन केले असता या बैठकीत खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, सचिन कांबळे पाटील, साखरवाडीचे सरपंच विक्रमसिंह भोसले, माजी सरपंच राजाभाऊ काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, फलटण तालुक्यातील जनतेकडे मी आज आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहे, तुमचा आशीर्वाद हा निवडणुकीसाठीच नाही तर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी, आणि आपण जी विकासाची गंगा सुरू केलेली आहे, तो प्रवाह अखंडितपणे चालू ठेवण्यासाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत. येणाऱ्या निवडणुकीत कमळाचे चिन्ह समोरील बटन दाबून भरघोस मतदान करण्याचे आवाहन खासदार रणजीतसिंह यांनी यावेळी केले.

    मागील पंचवार्षिक थोडी अवघड होती, कारण मी नवखा होतो, माझ्यासोबत  जयकुमार गोरे यांच्या व्यतिरिक्त कोणीही आमदार नव्हते परंतु आज निवडणुकीचे चित्र वेगळे आहे, आज भारतीय जनता पार्टी तळागाळात रुजली आहे, खटाव माण मध्ये गेले तर, तेथील पाण्याचे प्रश्न  सोडवले असून, दिलेला शब्द पूर्ण केला आहे. जयकुमार गोरे यांची मोठी ताकद पाठीशी आहे. पुढे माळशिरस तालुक्यात जर पाहिलं तर तेथील आमदार राम सातपुते तसेच माळशिरस नगरपालिकेतील सर्व नगरसेवक हे आपल्याकडे आहेत, महाळुंग नगरपालिका, नातेपुते नगरपालिका सर्व नगरसेवक हे आपल्याकडे आहेत, सांगोला तालुक्यात शहाजी बापू मागच्यावेळी आमदार नव्हते परंतु यावेळी आता शहाजी बापू आमदार आहेत.  दीपकआबा साळुंखे पाटील हे देखील आपल्या सोबत आलेले आहेत. शेकाप मधून काही लोक आलेले आहेत. त्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पंढरपूर मध्ये आल्यानंतर प्रशांत परिचारक आपल्याबरोबर आहेत. नगरपालिका, पंचायत समिती, मार्केट कमिटी हे सर्व प्रशांत मालकांच्या बरोबर आहे. कल्याणराव काळे हे कारखान्याचे चेअरमन आहेत तेही आपल्या बरोबर आहेत. आमदार बबनदादा शिंदे साहेब व त्यांचे सुपुत्र रणजीतभैय्या हे देखील आपल्या बरोबर आहेत, त्यांचे स्वतःचे पाच कारखाने आहेत. संजयमामा शिंदे हे देखील आपल्याबरोबर आहेत. रश्मीताई बागल यादेखील आपल्याबरोबर आहेत. मतदारसंघातील सहा आमदारांपैकी पाच आमदार माझ्याबरोबर आहेत. फलटणची जनता देखील माझ्याबरोबर आहे, त्यामुळे ही निवडणूक आपण जिंकू असा विश्वास खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

    भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केलेला विकास व
 नागरिकांसाठी आणलेल्या योजना या नागरिकांपर्यंत पोहचल्या नाहीत असे झाले नाही, प्रत्येक योजना ही लाभार्थ्यांपर्यंत पोहचली आहे, त्यामुळे असा एकही माणूस शिल्लक नाही की ज्याने लाभ घेतला नाही, फलटण तालुक्यातील प्रत्येक प्रकल्पात देवेंद्रजी, व नरेंद्र मोदी यांचे सहकार्य लाभले असल्याचे खासदार रणजीतसिंह यांनी सांगितले.

    ज्या नेत्यांना पाणी देण्यासाठी नेमले त्यांनीच पाणी चोरले, ज्या नेत्यांना विकास करण्यासाठी नेमले, त्या शरद पवार यांनी या तालुक्याचा विकास खंडित केला, शरद पवारांनी मनात आणले असते तर रेल्वे सुरू करू शकले असते, चार वेळा मुख्यमंत्री असलेले शरद पवार या मतदार संघाचे नेते होऊन गेले, परंतु त्यांनी या मतदारसंघाचा विकास केला नाही, फलटण बारामती रस्ता करायचा नाही, फलटण बारामती रेल्वे करायची नाही, या मतदारसंघातील लोकांच्या अडचणी सोडवायच्या नाही अशी भूमिका घेतल्यामुळे फलटण तालुक्याचा विकास खुंटला असल्याची टीका खासदार रणजितसिंह यांनी केली.

No comments