Breaking News

निंभोरे ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत राजे गटाच्या सौ.रेखा लक्ष्मण लांडगे या विजयी

Mrs. Rekha Laxman Landge of Raje group won the Nimbhore Gram Panchayat Sarpanch post election.

   फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १८ - फलटण तालुक्यातील निंभोरे ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत  राजे गटाच्या सौ.रेखा लक्ष्मण लांडगे या विजयी झाल्या असून त्यांना ५ मते मिळाली तर खासदार गटाच्या वनिता संदीप अडसूळ यांना ३ मते मिळाली. 

    भूतपूर्व सरपंच सौ. कांचन निंबाळकर या अपात्र झाल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. विजयी सरपंच सौ. रेखा लांडगे यांचे अभिनंदन  आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले. याप्रसंगी उपसरपंच मुकुंदराव रणवरे, सदस्य नितीन मदने, नवनाथ कांबळे, सौ मोहिनी चिंचकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments