Breaking News

माझा कार्य अहवाल वाचल्यानंतर माझ्यावर टिका करणारेच मला मतदान करतील - सुप्रिया सुळे


Only those who criticize me after reading my work report will vote for me - Supriya Sule

    बारामती (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ - बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतर्फे आयोजित सभेला  सुप्रियाताई सुळे उपस्थित राहिल्या. याप्रसंगी शरद पवार साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, उपाध्यक्ष भूषणसिंह राजे होळकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर, माजी मंत्री विश्वजित कदम, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे,पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर, शिरुर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ. अमोल कोल्हे, माजी आमदार मोहन जोशी, जयदेव गायकवाड, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, अशोक पवार, आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजित पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे, माजी नगरसेवक सचिन दोडके, सक्षणा  सलगर, मेहबूब शेख यांच्यासह महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे नेते, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना, लोकसभा निवडणूकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिल्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या सोनियाजी गांधी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आपचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील सर्व मित्रपक्षाचे खा. सुप्रियाताई सुळे यांनीआभार मानले.
खासदार म्हणून काम करत असताना प्रथम राष्ट्र नंतर राज्य, त्यानंतर पक्ष आणि शेवटी कुटुंबाला प्राधान्यक्रम देत काम करीत आहे, असे सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले. विरोधक आमच्यावर नेहमी टिका करत असतात. पण आज जे टिका करत आहेत. ते अगोदर सोबतच होते. ते वेगळे होऊन थोडाच काळ झाला आहे. त्यामुळे त्या टिकेचे आश्चर्य वाटते, असे सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले. विरोधक आमच्यावर वैयक्तिक टिका करतात. पण आम्ही कधीही त्यांच्यावर वैयक्तिक टिका करणार नाही, आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ असे सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.

    आता ही निवडणूक आमच्या हातात राहिली नसून महाराष्ट्राच्या जनतेने हातात घेतली आहे. कारण जनता सत्ताधाऱ्यांच्या अन्यायाला कंटाळली आहे. अनेकांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यांना तुम्ही फक्त माझा नंबर द्या, कारण हे ज्यांना घाबरतात त्यांच्यासमोर आम्ही ‘डंके की चोट पे’  भाषण करतो असे सांगत इशारा दिला. आता उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे आईस म्हणजे बर्फाची गरज पडत आहे. पण आज आईसचा अर्थ बर्फ नाहीतर आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी असा झाला आहे. 
मी नेहमीच मोठ्यांचा सन्मान केला त्यामुळे कधीही स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये लक्ष घातले नाही.मी फक्त मदत करत होते. पण आता यापुढे स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रातील निवडणूकही महाविकास आघाडीमधून लढणार अशी घोषणा सुप्रियाताई सुळे यांनी केली. विरोधक म्हणत आहेत की, मी दहा वर्षात कोणतेही काम केले नाही. केंद्राकडून कोणताही निधी आणला नाही, पण त्यांना माझी विनंती आहे की, कदाचित त्यांनी माझा कार्य अहवाल वाचला नसेल. त्यामुळे विरोधकांना मी माझा अहवाल पाठवणार असून त्यांनी शक्य असल्यास तो वाचावा. माझा माझ्या कामावर इतका विश्वास आहे की, कार्य अहवाल वाचल्यानंतर माझ्यावर टिका करणारेच मला मतदान करतील याची मला गँरंटी आहे. पण ही माझी खरी गँरंटी आहे 'त्यांची' ती गँरंटी नाही असा उपरोधिक टोला सुप्रियाताई सुळे यांनी लगावला.

    विरोधक आमच्यावर पातळी सोडून टिका करत आहेत. पण आम्ही त्यांच्यावर टिका न करता आम्ही आमची भाषणे अधिक उंचावर घेऊन जाऊ, कारण माझी लढाई दिल्लीतील त्या अदृश्य शक्तीविरोधात, कारण ती शक्ती महाराष्ट्राच्या मूळावर उठली आहे. त्या शक्तीने मराठी माणसाचे पक्ष फोडले. आपल्या राज्यातील तरुणांच्या हक्काचा रोजगार हिरावण्यामागे राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार आहे, असा सुप्रियाताई सुळे यांनी आरोप केला.

No comments