Breaking News

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांचा झंझावती दौरा

Mrs. Ranjitsinh Naik Nimbalkar's campaign. Jijamala Naik Nimbalkar's visit to Jhanjavati

    फलटण – भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माजी जिल्हा परिषद सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर आणि सौ मनीषाताई नाईक निंबाळकर यांचा फलटण शहरात विविध ठिकाणी झंजावती दौरा सुरू असून, या दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

    माढा लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे निवडणूक लढवत असलेले विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फलटण शहरातील विविध भागामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, सौ. मनीषाताई नाईक निंबाळकर, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

    गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत फलटण शहर व तालुक्याच्या विकासासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली विकास कामांची माहिती यावेळी मतदारांना देण्यात आली. घरोघरी संपर्क साधताना मतदारांतर्फे सर्वांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहीवळे, अजय माळवे, सुधीर अहीवळे,फिरोज आतार, फलटण शहर भाजप अध्यक्ष अनुप शहा,अमोल सस्ते, मेहबूबभाई मेटकरी,राजेंद्र निंबाळकर,आबा बेंद्रे,राजकुमार देशमाने,प्रसाद पाटील,अमोल घाडगे, रियाजभाई इनामदार,नंदकुमार घाडगे,सौ उषा राऊत आदी यावेळी उपस्थित होते.

No comments