Breaking News

माजी आमदार कै. चिमणराव कदम गटाचा धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा

Former MLA Kai. Chimanrao Kadam group support for courageous Mohite Patil

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२८ - माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते व गटातील  ज्येष्ठांशी चर्चा केल्यानंतर, माजी आमदार कै. चिमणराव कदम गटाचा पाठिंबा हा राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना जाहीर करून, आजपासून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे युवा नेते सह्याद्रीभैय्या चिमणराव कदम यांनी, फलटण येथील निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

    मी ग्रामीण भागाचा दौरा करत असताना, कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या,  सध्याचे जे राजकारण चालू आहे ते चुकीचे असून, राजकारणाची पातळी खालावली आहे. सगळीकडे फोडाफोडीचे राजकारण चालू आहे, तत्व सोडून राजकारण चालू आहे अशी भावना कार्यकर्त्यांनी स्पष्ट केली. गेली नऊ वर्ष आपण भाजपासाठी काम करतोय, परंतु ज्या पद्धतीने आपल्या गटाला न्याय मिळाला पाहिजे होता, तसा न्याय मिळाला नसल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून आले. त्यामुळेच कार्यकर्त्यांशी व गटातील ज्येष्ठ व्यक्तींशी चर्चा करून, आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत जाहीर पाठिंबा देऊन, आजपासून त्यांच्या प्रचारार्थ दौरा सुरू करणार असल्याचे सह्याद्रीभैया कदम यांनी जाहीर केले.

    विकासाचे राजकारण बाजूला राहिले  आहे आणि सध्या फक्त फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, त्यामुळे जनता चिडलेले आहे. राजकारणात कुठलीही तत्वे राहिली नाही,चिमणराव कदमांनी जसे तत्त्वाला धरून राजकारण केलं, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला धरून राजकारण केलं, त्याचबरोबर शाहू - फुले - आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घेऊन राजकारण केले, तसे राजकारण सध्या दिसत नाही त्यामुळेच मी हा निर्णय घेतला असल्याचे सह्याद्रीभैय्या कदम यांनी स्पष्ट केले.

    भाजपा पदाचा राजीनामा देणार का ? असे पत्रकारांनी विचारले असता, मी भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून, ज्या पद्धतीने तेव्हापासून काम झाले आहे, त्याच्यात कुठल्याही पद्धतीचा रिझल्ट आलेला नाही, त्यामुळे लोक नाराज आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे माझ्याकडे कोणतंही पद नाहीये, त्यामुळे मी राजीनामा देण्याचा संबंध येत नाही, मी आज माजी आमदार कै. चिमणराव कदम गटाची भूमिका मांडली, असून धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणण्यासाठी आपण प्रचारात सक्रिय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments