Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर ; श्रीमंत रामराजेंसह ३७ स्टार प्रचारक

The list of star campaigners of NCP has been announced

गंधवार्ता वृत्तसेवा दि.२८ - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने प्रचारासाठी महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघात फिरणाऱ्या नेत्यांची म्हणजेच स्टार प्रचारकांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली यांनी निवडणूक आयोगाला दिली आहे. यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह ३७ नेत्यांचा समावेश आहे. 

स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय सचिव खासदार सुनिल तटकरे,  मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,माजी मंत्री वाय. पी. त्रिवेदी, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धर्मरावबाबा आत्राम, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मंत्री संजय बनसोडे, मंत्री अदिती तटकरे, सुबोध मोहिते,राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. के. शर्मा, सय्यद जलालूद्दीन, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार अमोल मिटकरी, आमदार सुनील टिंगरे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार सुनिल शेळके,  आमदार विक्रम काळे, आमदार चेतन तुपे, आमदार नितीन पवार, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार दत्तामामा भारणे, आमदार आमदार सतीश चव्हाण, उमेश पाटील, मा. खा समीर भुजबळ, मंत्री अनिल पाटील, माजी आमदार अमरसिंह पंडित, नजीब मुल्ला, सुरज चव्हाण, इद्रीस नायकवडी, कल्याण आखाडे,  सुनिल मगरे यांचा समावेश आहे.

No comments