Breaking News

घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदार यांनी येणेबाकी रक्कम भरून कारवाई टाळावी - मुख्यधिकारी निखिल मोरे

Gharpatti and panipatti arrears should avoid action by paying the outstanding amount - CEO Nikhil More

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ - फलटण नगर परिषदेमार्फत नगरपालिका हद्दीतील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची मोहिम हाती घेण्यात आलेली असून, त्यामध्ये थकबाकीदारांचे नळ कनेक्शन नगरपालिकेच्या वसुली पथकाकडून बंद करणेत येत आहे. नगर परिषदेकडून ही कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदार मिळकतधारक यांना त्यांचेकडे असणारी येणेबाकीची रक्क्म नगर परिषदेकडे भरणा करुन नगरपालिकेला वसुलीकामी सहकार्य करणेचे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. निखिल मोरे यांचेमार्फत करणेत आले आहे.

    सध्या सन २०२३-२०२४ ची वर्षअखेर सुरु असून ३१ मार्च २०२४ अखेर काही मिळकतदारांनी अदयापही मिळकतकराची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे नगरपालिकेमार्फत कराची रक्कम वसुलीकामी पालिका कर्मचारी यांची ११ वसुली पथके विभागनिहाय तयार केलेली आहे. सदर पथके नागरीकांच्या घरोघरी जावून मिळकत कर भरणा करणेकामी नागरीकांना आवाहन करुन वसुली करीत आहेत. नगरपालिकेमार्फत थकबाकीदार यांना आवाहन करणेत येते की, त्यांचेकडील थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टीची रक्कम त्वरीत भरणा करुन जप्ती, नळ कनेक्शन बंद करणे या कटू बाबी टाळणेकामी कर भरणा करुन सहकार्य करावे.

No comments