प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचा आज भाजपात प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ - फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय काँग्रेसचे ४० वर्षांपासूनचे खंदे समर्थक प्रल्हादराव साळुंखे- पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज बुधवार दि. १७ जानेवारी रोजी फलटण येथे त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंखे पाटील यांनी दिली.
माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावतीने आयोजित माढा लोकसभा मतदारसंघांमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज १७ रोजी संपन्न होत आहे. याप्रसंगी फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत.

No comments