अयोध्या मुहूर्तावर फलटणच्या श्रीराम व श्रीदत्त मंदिर यांचा शिखर जीर्णोद्धार शुभारंभ
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ - अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी मंदिर प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत असून, त्याच शुभ मुहूर्तावर सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२.२० वाजता श्री नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज् ट्रस्ट, फलटण यांच्या माध्यमातून फलटण संस्थानचे अधिपती व माजी सभापती, महाराष्ट्र विधान परिषद आ. श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते श्रीराम व श्रीदत्त मंदिर यांचा शिखर जीर्णोद्धार शुभारंभ सोहळा विधीपूर्वक करण्यात येणार आहे. यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून फलटण शहर व तालुक्यातील भाविकांनी या धार्मिक सोहळयात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन श्री नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज् ट्रस्ट, श्रीमंत रघुनाथराजे विक्रमसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत यशोधराराजे उदयसिंह नाईक निंबाळकर, प्राचार्य विश्वासराव मुगुटराव देशमुख, श्री. शरदराव विश्वासराव रणवरे यांनी केले आहे.
सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ रोजी स.५.३० ते स.७.३० प्रभू श्रीराम व श्रीदत्त प्रभू लघुरुद्र पुरुष सूक्त, अभिषेक, पूजन होईल. त्यानंतर स.७.४५ ते स.८.३० पुण्याहवाचन विधी, शिखर जीर्णोद्धार कार्यक्रम संकल्प विधी, स.९.०० ते स.१०.०० मुख्य देवता स्थापना, धर्म ध्वज पूजा व शिखर पूजा, स.११.०० ते दु.१२.१० होम हवन विधी व पूर्णाहुती, दु.१२.२० ते दु.१२.३० श्रीराम मंदिर व श्रीदत्त मंदिर शिखराचा जीर्णोद्धार सोहळा, दु.१२.३० ते दु. १२.५० महाआरती, दु.१.०० ते सायं. ४.०० महाप्रसाद, सायं.४.३० ते सायं. ५.०० श्री गणपती अथर्वशीर्ष, श्री रामरक्षा स्तोत्र, श्री मारुती स्तोत्र पठण (रामकृष्ण पाठशाळा, फलटण), सायं. ५.०० ते सायं.८.०० प्रभू श्रीरामचंद्र यांच्यावर आधारित हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम (सादरकर्ते-कला प्रसारक संस्था, पुणे) होणार आहे.

No comments