राजुरी येथील कापड दुकान फोडले ; एक लाख रुपयाचा माल लंपास
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ - कुरवली चौक, राजुरी ता. फलटण येथील शिवतारा कलेक्शन या कापड दुकानाच्या छताचे पत्रे कापून, आतमध्ये प्रवेश करून, सुमारे एक लाख रुपयांचे रेडिमेड कपडे तसेच कपड्यांचे तागे अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,सुरज धनाजी जाधव रा. शिंदेवाडी ता. माळशिरस यांचे कुरवली चौक, राजुरी ता. फलटण येथे शिवतारा कलेक्शन हे कापड विक्रीचे दुकान आहे. दि. १७/१/२०२४ रोजी रात्रौ. ७.३० ते ते १८/१/२०२४ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान शिवतारा कलेक्शन या कापड दुकानाच्या छताचे पत्रे कापून, आत प्रवेश करून, दुकानातील एकूण १ लाख २ हजार ७४९ रुपये किंमतीचे रेडीमेड कपडे व कपड्यांचे तागे असा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. यामध्ये विविध कंपनीच्या साड्या, ब्लाउज, शूटिंग कपडा तागा, विविध कंपन्यांचे शर्ट व जीन्स, मुला मुलींची रेडिमेड कपडे, टॉवेल यांचा समावेश आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चांगण हे करीत आहेत.
No comments