मासे पकडण्यास गेलेल्या इसमाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : ओढ्यामध्ये मासे पकडण्यास गेलेल्या एका पंचेचाळीस वर्षीय इसमाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना मुरूम ता. फलटण येथे घडली आहे.
तानाजी रामचंद्र जाधव वय ४५, रा. मुरूम ता फलटण असे बुडून मरण पावलेल्याचे नाव आहे. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, तानाजी जाधव हे मुरूम गावच्या हद्दीतील ओढ्यात रविवारी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास मासे पकडण्यासाठी गेले होते, त्या वेळी पाण्यात पडून बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची खबर जाधव यांचे सासरे सुरेश शंकर खोमणे रा. मुरूम ता. फलटण यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली असून, अधिक तपास पोलिस हवालदार ओंबासे करीत आहेत.
No comments