Breaking News

शहीद जवान वैभव भोईटे यांच्या कुटुंबियांचे श्रीमंत रामराजे यांच्याकडून सांत्वन

Shrimant Ramraje consoles family of Shahid Jawan Vaibhav Bhoite

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ ऑगस्ट : शहीद जवान वैभव संपतराव भोईटे यांच्या पार्थिवावर राजाळे, ता. फलटण येथे शासकीय इतमामात काल अंत्यसंस्कार झाल्यानंतर आज विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शहीद जवान वैभव भोईटे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व शहीद जवान वैभव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व धीर दिला. 

    यावेळी श्रीमंत रामराजे म्हणाले, शहीद जवान वैभव भोईटे यास लेहमध्ये देशसेवा बजावत असताना वीरगती प्राप्त झाली. वैभवच्या निधनाने भोईटे कुटुंबियांसह संपूर्ण तालुका शोकसागरात बुडालेले आहे. भोईटे कुटुंबीयांवर आकाश कोसळले असून, त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू तसेच त्यांच्या  कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करू असे, आश्वासन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.  यावेळी भोईटे कुटुंबीय तसेच माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, संभाजीबापू निंबाळकर,  निखिल निंबाळकर,  खटकेवस्ती सरपंच बापूराव गावडे, ॲड. मारुतराव शेडगे, मुकुंदराव रणवरे, सुरेश काकडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments