Breaking News

वाखरी ट्रान्सफॉर्मरमधून २२ हजार रुपयांची तांब्याची तार व ऑइलची चोरी

Theft of copper wire and oil worth 22 thousand rupees from Wakhri transformer

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. : फलटण तालुक्यातील वाखरी येथील  डीपी ट्रान्सफॉर्मरमधून ५० किलो तांब्याची तार व ४० लिटर ऑइल असा एकुण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल आज्ञात चोरट्याने चोरुन नेला व ऑइल सांडून नुकसान केले आहे.
          याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी की, दिनांक १८/५/२०२३ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या पूर्वी फलटण तालुक्यातील वाखरी येथील  डीपी नंबर ११३५९८  या ट्रान्सफॉर्मरमधून ५० किलो तांब्याची तार व ४० लिटर ऑइल असा एकुण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल आज्ञात चोरट्याने चोरुन नेला व ऑइल सांडून नुकसान केले असल्याची फिर्याद तानाजी महादेव मुळीक वायरमन म. रा. वि. वि.कंपनी  रा. कोळकी ता. फलटण यांनी दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार कदम करीत आहेत.

No comments