Breaking News

आर.के.सी. इन्फ्रास्ट्रक्चरचे ३ डंपर पकडले ; आर.के.सी.ला आंदोलनकर्त्यांचा दणका

3 dumpers caught transporting illegal secondary minerals of RKC Infrastructure Company

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० : आर. के.सी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करणारे ३ डंपर  दि. २० रोजी पहाटे आंदोलनकर्त्यांनी पकडले व पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिले. फलटण येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे आंदोलनकर्त्यांनी हे गौण खनिज वाहतूक करणारे ओव्हरलोडेड डंपर पकडले आहेत.

    पुणे - पंढरपूर महामार्गावर  रात्रीच्या वेळी भरधाव दहा चाकी टिपरने उडवल्यामुळे आमिर शेख व गणेश लोंढे या युवकांचा जागीच मृत्यू झाला. दोन्हीही युवकांच्या घरची परिस्थिती ही अत्यंत नाजूक असून दोन्हीही युवकांच्या कुटुंबीयांना शासनाच्या व आरकेसी कंपनीच्या माध्यमातून प्रत्येकी ५० लाख रुपये आर्थिक मदत मिळाली पाहिजे तसेच आर. के.सी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीवर गुन्हा दाखल करून, काळया यादीत नाव समाविष्ट करावे, जोपर्यंत आर. के. सी. कंपनीवर गुन्हा दाखल होत नाही, तसेच त्यांच्या वारसांना निधी मिळत नाही, तोपर्यंत आर. के. सी. कंपनीचे काम बंद पाडण्यात येईल असा इशारा दि. १८ रोजी मोर्चेकर्‍यांनी, उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला होता. त्याअनुषंगाने आंदोलनकर्त्या युवकांनी, आरकेसी कंपनीच्या  बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीस रोखण्यास सुरवात केली असल्याची चर्चा आहे.

    काही लोकांना हाताशी धरुन आरकेसी कंपनी बेयकायदेशीर पणे गौण खनिज वहातूक करतआहे. कंपनी  मुरुम, मातीचे नियमबाह्य उत्खनन करुन, शासनाचा महसुल बुडवला आहे. दिनांक २० मे रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास आंदोलनकर्त्या युवकांनी क्रांतिसिंह नाना पाटील चौक फलटण येथे, आरकेसी कंपनीचे बेयकायदेशीरित्या गौण खनिज वहातूक करणाऱ्या ३ डंपरला आडवुन, त्यांना पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्या युवकांनी केली आहे.

No comments