खा. रणजितसिंह यांच्या प्रयत्नातून नगरपालिका विकास कामांकरीता २ कोटी २० लाख रुपये मंजूर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १८ : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून फलटण नगरपालिका विकास कामांकरीता २ कोटी २० लाख रुपये मंजूर करून, फलटण शहरातील सर्व जाती-धर्म तसेच विकासापासून वंचित राहिलेल्या भागाला न्याय देण्याचे काम केले आहे. तसेच केंद्र सरकार व राज्य यांच्या माध्यमातून आता विकासाची गंगा फलटण तालुक्यात व शहरात सतत येत आहे. त्यामुळे सूज्ञ फलटणकरांनी विकासाला साथ द्यावी, असे आवाहन फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केले आहे.
शासनाच्या १६ मे २०२३ च्या नगर परिषदेतील मंजूर विकासकामांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. १) वार्ड क्र. ०१ मध्ये पुजारी कॉलनी येथे सार्वजनिक शौचालय बांधणे ( रक्कम रू. १० लक्ष). २) वार्ड क्र. ०१ मध्ये मरिमाता मंदिराशेजारील नगरपालिका जागेत सभामंडप बांधणे ( १० लक्ष), ३) वार्ड क्र. ०१ मध्ये महादेव मंदिर परिसरात सभामंडप बांधणे (१० लक्ष), ४) वार्ड क्र. ०३ मध्ये इंदिरानगर, मलटण येथे अंतर्गत काँक्रिटीकरण करणे (१० लक्ष). वार्ड क्र. ०३ मध्ये झिरपे गल्ली, मंगळवार पेठ परिसर अंतर्गत काँक्रिटीकरण करणे. (१० लक्ष). ६) वार्ड क्र. ०४ मध्ये खदळे झोपडपट्टी, मलटण येथे अंतर्गत काँक्रिटीकरण करणे (१० लक्ष). ७) वार्ड क्र. ०५ मध्ये कुंभार टेक, गोसावी वस्ती, मलटण येथे अंतर्गत काँक्रिटीकरण करणे (१० लक्ष). ८) वार्ड क्र. ०६ मध्ये ज्ञानी नगर अंतर्गत काँक्रिटीकरण करणे (१० लक्ष). ९) वार्ड क्र. ०६ मध्ये हत्तीखाना महात गल्ली अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे (१० लक्ष). १०) वार्ड क्र. ०६ मध्ये ब्राह्मण गल्ली अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे (१० लक्ष) ११) वार्ड क्र. ०७ मध्ये रविवार पेठ, चौंडेश्वरी मंदिर परिसर अंतर्गत काँक्रिटीकरण करणे (१० लक्ष). १२) वार्ड क्र. ०७ मध्ये मेटकरी गल्ली येथे अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे (१० लक्ष). १३) वार्ड क्र. ०८ मध्ये नंदीवाला वसाहत अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे (१० लक्ष). १४) वार्ड क्र. ०८ मध्ये मोती चौक, घडशी गल्ली अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे (१० लक्ष). १५) वार्ड क्र. ०९ मध्ये धनगर वाडा फलटण अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे (१० लक्ष). १६) वार्ड क्र. १० मध्ये शुक्रवार पेठ, अंडीवाला बोळ परिसर काँक्रिटीकरण करणे लक्ष). १७) वार्ड क्र. १० मध्ये अहिंसा मैदान येथे पेव्हर ब्लॉक बसविणे (१० लक्ष). १८) वार्ड क्र. ११ मध्ये पद्मावती नगर येथे अंतर्गत काँक्रिटीकरण (१० लक्ष). १९) वार्ड क्र. १२ मध्ये हडको कॉलनी अंतर्गत काँक्रिटीकरण करणे (१० लक्ष). २०) वार्ड क्र. १२ मध्ये ६४८४ ब, बारवबाग येथील ओपन स्पेस येथे नाना-नानी पार्क उभारणे (१० लक्ष). २१) वार्ड क्र. १२ मध्ये विद्यानगर ओपन स्पेस मूकबधिर शाळेच्या जागी सामाजिक सभागृह बांधणे (१० लक्ष). २२) क्र. १२ मध्ये मदरसा तालीमूल कुराण (अक्सा मस्जिद) लक्ष्मीनगर येथे बुजुखाना, ताहरतखाना, पाण्याची टाकी बांधणे (१० लक्ष)
No comments