दुधेबावी तलावातून १० ब्रास वाळूचे अवैधरित्या उत्खनन करून चोरी
फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २० - दुधेबावी ता. फलटण येथील तलावातून दहा ब्रास वाळूचे अवैधरित्या उत्खनन करून, चोरी केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार,दि. १५/५/२०२३ रोजी रोजी रात्रौ ८.३० वाजण्याच्या सुमारास, मौजे दुधेबावी ता. फलटण गावचे हद्दीत दुधेबावी ते गिरवी रस्त्यालगत असणाऱ्या ग्राम तलाव येथे अज्ञात इसमाने अंदाजे दहा ब्रास वाळू बेकायदा, बिगर परवाना वाळू उत्खनन करून चोरून नेली असल्याची फिर्याद तलाठी राहुल भानुदास इंगळे यांनी दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस फौजदार खाडे करीत आहेत.
No comments