Breaking News

मिलिंद दत्ता अहिवळे यांची थायलंड दूतावासात प्रकल्प अधिकारी पदी निवड

Milind Datta Ahiwale has been selected as Project Officer at the Embassy of Thailand

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ मे :  मिलिंद दत्ता अहिवळे यांची थायलंड दूतावासात प्रकल्प अधिकारी पदी निवड झाली आहे. यातून थायलंड आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. मिलिंद दत्ता अहिवळे यांनी दि. १९ मे रोजी दिल्ली येथे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.   

थायलंड आणि भारत या दोन्ही देशांमध्ये असणारी व्यापरिक संधी गुंतवतुकदार, कंपनी, चेंबर ऑफ कॉमर्स, वित्तीय संस्था, शासकीय संस्था आणि इतर देशांच्या दूतावास अशांपरियांत पोहचविण्याचे प्रमुख काम मिलिंद अहिवळे यांचे असेल. आर्थिक गुंतवणूक आणि चलनविषयक धोरणांची त्यांची सखोल माहिती असल्याने अहिवळे थायलंड आणि भारत यांच्यातील व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बाजावतील.

यापूर्वी, मिलिंद अहिवळे यांच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यकाळात त्यांना आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांच्या जटिल रचनेवर काम करण्यासाठी संधी मिळाली. शिवाय, मिलिंद अहिवळे यांची शैक्षणिक पार्श्वभूमी या नवीन भूमिकेसाठी त्यांची पात्रता आणखी मजबूत करते. इंग्लंडमधून फायनान्समध्ये मास्टर ऑफ सायन्स (एमएससी) पदवी आणि फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथून अर्थशास्त्रातील बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए) पदवीसह, अहिवळे आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरणांचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात.

तसेच, मिलिंद अहिवळे यांची सामाजिक कल्याणासाठी असलेली बांधिलकी त्यांच्या विविध सामाजिक संस्थांसोबतच्या सहभागातून दिसून येते.  प्रगत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा प्रकल्पासारख्या शैक्षणिक उपक्रमांसाठी त्यांनी केलेले काम, विशेषत: ग्रामीण भागात प्रगती आणि विकासाला चालना देण्याची त्यांची तळमळ दर्शवते.

मिलिंद अहिवळे यांचा आंतरराष्ट्रीय अनुभव आणि त्यांची वित्त क्षेत्रातील नामवंत पार्श्वभूमी यामुळे दोन्ही राष्ट्रांमधील आर्थिक सहकार्य आणि व्यापार वाढेल अशी अपेक्षा आहे.

No comments