प्रा.वर्धमान अहिवळे यांना डॉक्टरेट
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 21 - प्रा. वर्धमान विनायक अहिवळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून , विधी (Law ) या विषयांतील डॉक्टरेट ( Ph .D ) पदवी प्राप्त झाली. या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
प्रा. वर्धमान अहिवळे यांचा संधोधनाचा विषय भारतातील बलात्कार कायद्यातील बदलता कल: एक विश्लेषणात्मक अभ्यास ( Changing Trend in Rape Laws in India: An Analytical Study) हा होता. प्रा. वर्धमान ह्यांनी या पूर्वी तीन वेळा राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट ) व महाराष्ट्रातून जी सहा मुले लॉ विषयातून त्यावेळी राज्य पात्रता परीक्षा (सेट ) उत्तीर्ण झाली होती, त्यापैकी ते एक होते. त्यांचे मास्टर ऑफ लॉ (LL.M) व बॅचलर ऑफ लॉ (LL.B) आणि इंग्लिश विषयातील पदवी (B.A.) हे सर्व शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातून झालेले आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा जिल्हा परिषद शाळा क्रमांक ०२ मधून तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मधोजी हायस्कुल व यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण येथे झाले आहे. त्यांच्या सदर यशामध्ये त्यांच्या आई पुष्पा अहिवळे, वडील विनायक अहिवळे व थोरले बंधू मुकेश अहिवळे तसेच ॲड. गौरी जैन यांचा मोलाचा सहभाग आहे. याशिवाय त्यांचे इतर नातेवाईक , मित्रपरिवार व फलटण येथील सर्व समाज बांधव यांचेही सहकार्य वेळोवेळी लाभले आहे.
सध्या ते कर्मवीर भाऊसाहेब हिरे विधी महाविद्यालय, मालेगाव (नाशिक) येथे प्राचार्य पदी कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
No comments