Breaking News

विद्यार्थिनीचा पाठलाग ; दोन युवकांवर गुन्हा दाखल

Stalking the student; A case has been registered against two youths

    फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा)   -  महाविद्यालयातून चालत घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग केल्याप्रकरणी दोन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार,दि. १३ मे २०२३ रोजी  ११.३० वाजण्याच्या सुमारास मुधोजी महाविद्यालय फलटण येथून विद्यर्थिनी घरी जाण्यासाठी निघाली. ती जीवा महाले चौकातील  (सातारा रोड बाणगंगा पुलाजवळ)  बस स्टॉप कडे चालली होती.   रस्त्याने पायी चालत जात असताना, अचानक तिच्या पाठीमागुन आकाश दादासो झेंडे रा. वाठार निंबाळकर ता.फलटण जि.सातारा व ओंकार पोकळे रा. गोळेवाडी ता. फलटण जि. सातारा हे दोघेजण मोटार सायकलवर आले व आकाश झेंडे याने त्या विद्यार्थिनीशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने त्यास मज्जाव केला व बस स्टॉप कडे चालत निघाली. परंतु तरीही ते दोघे तिच्या पाठीमागे मोटार सायकल घेऊन आले असल्याची फिर्याद पीडित विद्यार्थीने दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार काकडे हे करीत आहेत.

No comments