धोकादायक पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई ; ५६ केसेस, ३० हजार ५०० रुपये दंड वसूल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ - फलटण शहरात धोकादायक पद्धतीने वाहने चालवणाऱ्यांच्या विरोधात, फलटण शहर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असून, काल एका दिवसात ५६ केसेस करत, ३० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी केले आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन मार्फत दिनांक १५ एप्रिल २०२३ रोजी मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे रोडवर विशेष मोहीम आयोजित करून, विना परवाना, वेगवान वाहन चालविणे, ट्रिपल सीट, विना हेल्मेट जाणाऱ्या व धोकादायक पद्धतीने वाहने चालवणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करून, ५६ केसेस करत ३० हजार ५०० रुपये दंड वसूल केला. फलटण शहर पोलीस स्टेशन मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, वाहतुकीचे नियमाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
No comments