कोळकी येथे घरफोडी ; ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ - मालोजीनगर, कोळकी, फलटण येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून, घरातील ६१ हजार ५०० रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज चोरून नेला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी रात्रौ.१० ते दि. २६ जानेवारी २०२३ रोजीचे ०१.१५ वाजण्याच्या दरम्यान, मालोजीनगर कोळकी, ता.फलटण जि.सातारा येथे सौ.मधुबाला पांडुरंग भोसले यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून, सौ भोसले यांच्या सासऱ्यांच्या बेडरुमची आतील कडी कशाच्यातरी सहाय्याने उघडुन आत प्रवेश करून, बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेल्या पत्र्याचे पेटीचे लॉक तोडुन पेटातील, ४० हजार रुपये किंमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र, २० हजार रुपये किंमतीचे चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व ५०० रुपये किंमतीचे सोनाटा कंपनीचे घड्याळ आणि एक हजार रुपये रोख रक्कम असे एकूण ६१ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज, अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याची फिर्याद सौ. मधुबाला पांडुरंग भोसले यांनी दि. १२ एप्रिल २०२३ रोजी दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार लावंड हे करीत आहेत.
No comments